अंगुली निर्देश (?)

काही दिवसांपूर्वी एक विषय चर्चेत आला होता. शिवसेनेला गृहमंत्री पद हवं होतं. (अश्या चर्चा माध्यमातून समोर आल्या होत्या) पडद्याआड चर्चाही झाल्या. तेव्हा, मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद यशस्वीपणे सांभाळू शकतो अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असणार. तथापि, मिडियासमोर आमच्यात असं काहीच झालं नाही, सगळं आलबेल आहे, आणि बाहेर गृहमंत्री पदावरून निरर्थक चर्चा सुरू आहे असा सूर मुख्यमंत्र्यांचा स्पष्टीकरण करताना होता. पण..पण..पण.. आज जी घटना घडली ती जरा वेगळी आहे. तिच्यामागे वेगळे कंगोरे आहेत. आजच्या घटनेत आंदोलनात (स्वाभाविकपणे) मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री टार्गेट होऊ शकत होते. पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा अनिल परबांच्या निवासस्थानी न जाता शरद पवार यांच्या घरावरच संपकरी चालून गेले आहेत. इथे मोठं प्रश्नचिन्ह उभं होतं. आता एक प्रश्न पडतो. शरद पावरांसारखा नेता त्या वेळी कुठे आहे, हे आंदोलन करणार्यांना कसं माहीत झालं? पवार साहेब कधी दिल्लीला असतात, कधी बारामतीला असतात तर कधी मुंबईला असतात. कोणालाही सुगावा न लागता आंदोलनकर्ते योग्य जागी कसे पोहचतात? भरीस भर म्हणज...