पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'आॅपरेशन स्मिअर' आणि 'निद्रिस्त भारत'

इमेज
'आॅपरेशन स्मिअर' आणि 'निद्रिस्त भारत'     देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय. गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा 'आॅपरेशन स्मिअर आणि भारत' हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता. त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते. ते गुढ यासाठीच, की ते कुणालाच माहित नव्हते. माहित झाल्यावरही त्यावर कुणी सामान्य व्यक्ती चटकन विश्वास ठेवणार नाही. परंतु त्यांचे ते गुढ आज खरे वाटु लागले आहे. देशातील अस्थिर राजकिय सामाजिक परिस्थिती व वाढता असंतोष पाहता ब्रिगेडिअर महाजन यांनी वर्तवलेले भाकित स्पष्ट होऊ लागले आहे.     ' आॅपरेशन स्मिअर आणि भारत' या आपल्या लेखात ब्रिगेडिअर हेमंत महाजन मांडतात : "काळ बदलतोय तश्या युध्दनीती बदलत आहेत. शत्रुशी केवळ सीमेवर दोन हात न करता अन्य मार्गांनी कसे खिळखिळे करता येईल यासाठी नियोजनबद्ध डावपेच जगभरातील देश आखत अाहेत. पाकिस्तानही चीनच्या मदतीने भारताला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे. ...